April 29, 2025

Home »ई-पेपर परंपरागत शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित शिक्षणाचा नवीन शैक्षणिक धोरणात अंतर्भाव – डॉ.अशोकराव मोहेकर

परंपरागत शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित शिक्षणाचा नवीन शैक्षणिक धोरणात अंतर्भाव – डॉ.अशोकराव मोहेकर

  • शिक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
  • कळंब – कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयामध्ये ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित संस्थेच्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी संस्थेतील सर्व पहिली ते बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षक,शिक्षिका व लिपिक यांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्या वतीने शनिवारी २६ एप्रिल २०२५ रोजी १० ते ५.३० या वेळेत आयोजन केले आहे.या कार्यशाळेला विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यशाळेविषयी माहिती देण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. याप्रसंगी डॉ.अशोकराव मोहेकर यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याविषयी पत्रकारांना माहिती दिली.
    याधोरणाची अंमलबजावणी गत वर्षी उच्चशिक्षण पातळीवर सुरू झाली असून यावर्षीपासून हे नवीन शैक्षणिक धोरण शालेय पातळीवर राबविण्यात येत असून या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी शिक्षकांना प्राथमिक माहिती असावी या उद्देशाने संस्थेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षक,शिक्षिका व लिपिक यांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी १० ते ५.३० या वेळेत करण्यात आले आहे असे सांगितले.
    या नवीन शिक्षण धोरणात परंपरागत शिक्षणाबरोबरच कौशल्या वर आधारित व स्वतःच्या पायावर उभे राहता येईल याचा यात अंतर्भाव आहे असे सांगितले शिक्षक यासाठी महत्त्वाचा घटक आहे व त्याला याविषयीची माहिती असणे गरजेचे आहे.ज्यामुळे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचता येईल व नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश सफल व्हावा यासाठीचा प्रयत्न असल्याचे डॉ.अशोकराव मोहेकर यांनी सांगितले तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तरे दिली.या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शिक्षकांची एक दिवशीय कार्यशाळे विषयी पुढील माहिती दिली
    २६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षणाधिकारी( नियोजन) जिल्हा परिषद लातूरच्या तृप्ती अंधारे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर हे करणार आहेत. कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर उपस्थित राहणार आहेत.
    या कार्यशाळेस विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर गणपतराव मोरे,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशीवचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे, धाराशिव जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिवच्या अधिव्याख्याता सुचित्रा जाधव,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कळंबचे धर्मराज काळमाते,धनंजय डोळस, सोपान पवार,डॉ.माधव गोरे मार्गदर्शन करणार आहे.तरी जास्तीत जास्त शिक्षकांनी या एक दिवशीय कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. अशोकराव मोहेकर यांनी केले. या पत्रकार परिषदेस आप्पासाहेब मिटकरी उपप्राचार्य शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब,संभाजी गीड्डे मुख्याध्यापक छत्रपती संभाजी विद्यालय जवळा खुर्द, सोपान पवार,अरविंद शिंदे यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!