June 20, 2025

अंबाबाई यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

  • पिंपळगाव (डोळा) (राजेंद्र बारगुले) – दि.२० एप्रिल २०२५ रोजी रात्री अंबाबाई यात्रा निमित्त कोमल ताई पाटोळे यांचा सांस्कृतिक गाण्याचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून भरभरून प्रतिसाद दिला.
    यात्रेच्या दुसऱ्या दिवशी,म्हणजेच अष्टमीनिमित्त अंबाबाई यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला.या दिवशी पारंपरिक पद्धतीने बैलगाडा ओढण्याचा कार्यक्रम पार पडला.तसेच,डीजे लावून भक्तिभावाने पालखी मिरवणूकही काढण्यात आली. या मिरवणुकीत गावकऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
    यात्रेच्या वेळी यात्रेकरूंसाठी हॉटेल जय महाराष्ट्र ढाबा आणि जय महाराष्ट्र मोटर गॅरेज यांच्या वतीने थंड पाण्याचे १०० जार वितरित करण्यात आले.त्यामुळे यात्रेकरूंना दिलासा मिळाला.
    या यात्रेच्या यशस्वी आयोजनामध्ये गणेश टेकाळे, गणेश पवार,अशोक टेकळे, गजानन बारगुले,कालिदास दत्त, बंटी टेकाळे,आकाश टेकाळे, अक्षय टेकाळे यांचे तसेच जगताप वस्ती,दत्त वस्ती, बारगुले वस्ती,जमाले वस्ती व गावातील सर्व तरुण मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले.
    यावर्षीची अंबाबाई यात्रा अत्यंत जल्लोषात आणि भक्तिभावाने पार पडली.पंचक्रोशीतील अनेक गावांतून लोकांनी या यात्रेला भेट दिली.यात्रेचे आयोजन उत्तमरीत्या पार पडल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
error: Content is protected !!