August 9, 2025

आधुनिक वृद्धाश्रमाचा शुभारंभ

  • पुणे – काळ जसा बदलत गेला तशी विभक्त कुटुंब पद्धत वाढत गेली. पण एकत्र कुटुंब पध्दतीचे खूप फायदे आहेत,सगळ्याच मुलांना आपले आई-वडील नकोसे असतात असे नाही. काही वेळेस,नोकरी,व्यवसाय, शिक्षण यामुळे आई वडिलांसोबत राहणे मुलांना शक्य होत नाही. अशा परीस्थितीत आपले आई वडील सुरक्षित अशा एखाद्या चांगल्या सुविधा असलेल्या वृद्धाश्रमात असले तर त्यांची नीट काळजी घेतली जाईल असा विश्वास मुलांना असतो.त्यामुळे चागल्या सोयी-सुविधा देणारे वृद्धाश्रम महत्वाचे ठरतात,एकत्र कुटुंब पद्धत असताना वृद्धाश्रमाची आवश्यकता नव्हती,पण वाढते नागरीकरण, बदलती संस्कृती यामुळे विभक्त कुटुंब पद्धत अस्तित्वात येत गेली.वृध्दाश्रम या संकल्पनेच्या आपण विरोधात आहोत.प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांना घडवण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात.त्यामुळे वृद्धापकाळात आई-वडिलांची काळजी घेणे ही मुलांची जवाबदारी आहे.पण काळ बदलतो आहे,शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने मुलांना देश-विदेशात जावे लागत आहे, त्यामुळेच वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली ,याच परिस्थितीचा विचार करून वृक्षवल्ली सेवाभावी संस्था संचलित संस्थेच्या सर्व सदस्यांनी,संजीवनी वृद्धाश्रम चालू करण्याचा मानस धरून याची सुरुवात आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी कार्ला ता.मावळ, जि. पुणे येथे करण्यात आली,असून या वृद्धाश्रमात फक्त अनाथ व्यक्तींचेच संगोपन करण्यात येणार आहे, यावेळी स्वामी भारतानंद सरस्वती महाराज (महामंत्री अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र) यांच्या हस्ते पूजन करून उदघाटनाला सुरुवात केली यावेळी कार्ला गावच्या आदर्श सरपंच दीपाली ताई हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे, विष्णू हुलावळे, विनोद हुलावळे,, मुकुंद तिकोने, डॉ. दत्ता तपसे (वैद्यकीय अधिकारी, कार्ला) ,डॉ. आदित्य पतकराव (भारत सरकार प्रा. रेल्वे सल्लागार समिती सदस्य) ,वृक्षमित्र अरुण पवार, आरोग्यदूत अमोल लोंढे,ओजल मायक्रो सर्व्हिस फाउंडेशन चे अध्यक्ष श्री अमर शिंदे, वृक्षवल्ली सेवाभावी संस्थेचे सचिव राहुल केंद्रे, रमेश तपसे, सौगंध सोनवणे, लखन जावळे, सतीश चांबारे, आरोग्य सेवक विशाल कांदे, आरोग्य सेवक पंकज दांडगे,बाबूलाल मोहोळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!