कळंब – जनकल्याण अर्बन को.आँप.बँकेला एक कोटी पंचेचाळीस लाखाचा नफा. जनकल्याण अर्बन को.आँप.बँक ही बँक कळंब शहरातील नावलौकीक असलेली बँक असून या बँकेचा २०२४-२५ या अर्थिक वर्षाचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे.या ताळेबंदात बँकेने प्रगतीचा आणखी एक उचांक गाठलेला पाहावयास मिळत आहे.बँकेचे भागभांडवल मार्च २०२४ अखेरवर रू ३७८.२५ लाख होते.त्यामध्ये वाढ होऊन ते रू.३९७ : जनकल्याण अर्बन को.आँप.बँकेला एक कोटी पंचेचाळीस लाखाचा नफा. या बाबत सविस्तर वृत्त असे की,जनकल्याण अर्बन को.आँप.बँक ही बँक कळंब शहरातील नावलौकीक असलेली बँक असून या बँकेचा २०२४-२५ या अर्थिक वर्षाचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे.या ताळेबंदात बँकेने प्रगतीचा आणखी एक उचांक गाठलेला पाहावयास मिळत आहे.बँकेचे भागभांडवल मार्च २०२४ अखेरवर रू ३७८.२५ लाख होते.त्यामध्ये वाढ होऊन ते रू.३९७ लाख झाले आहे.तसेच बँकेच्या ठेवी गतवर्षी २०२४ अखेर रू. ७१२६.५३लाख होत्या त्यामध्ये वाढ होऊन रू.८४७८.६८ लाख इतक्या झाल्या आहेत.कर्जवाटप २०२४ अखेर ४८४८.७७ लाख इतके होते त्यामध्ये वाढ होऊन ५१६२.६७ लाख इतके झाले आहे.यावर्षी बँकेस ढोबळ नफा एक कोटी पंचेचाळीस (१४५ लाख) एवढा झाला आहे. तसेच बँकेच्या एकूण ७ शाखा कार्यरत असून आणखी दोन शाखा अहमदपूर जि.लातूर व केज जिल्हा बीड येथे उघडण्यास रिझर्व बँक आँफ इंडियाने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.विश्वनाथ एम.पेकमवार सेवा निवृत्त झाले असून बँकेच्या सेवेत असलेले वरीष्ठ अधिकारी विजय सांजेकर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर सर्व सन्माननिय संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उमेश दादा कुलकर्णी यांनी दिली. या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी झालेल्या स्वागत समारंभास बँकेचे संचालक संदिप बावीकर,महेश जोशी, सुधीर धोकटे,राजेंद्र दीक्षित, आशोक शिंपले,अरूण जोशी, विनायक आवाड बँकेचे अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे, रोहित वेदपाठक,तसेच सदाफुले,प्रमोद कुलकर्णी,सुशिल शेळके,बीभिषण राखुंडे,सरपंच संतोष कस्पटे आदिंसह हजर होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले