कळंब – बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी तसेच शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होणाऱ्या “सा.साक्षी पावन ज्योत” या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या कळंब शहर प्रतिनिधीपदी श्री. महेश फाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निमित्ताने त्यांना अधिकृत ओळखपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी श्री.महेश फाटक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
श्री.महेश फाटक यांच्या प्रामाणिक व निःपक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न,स्थानिक समस्या आणि जनतेच्या हक्कांचे प्रतिनिधित्व प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी कार्यकारी संपादक अविनाश घोडके,लोकमत पत्रकार महेश मिटकरी,दैनिक धाराशिव नामा तालुका प्रतिनिधी अशोक कुलकर्णी,महादेव जगताप,पोपट साळवे आदींची उपस्थिती होती.
More Stories
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी
“रस्ते की मृत्यूचे सापळे?” — अतिक्रमणखोर मोकाट,प्रशासन झोपेत;कळंबमध्ये महिलेचा चिरडून मृत्यू
तात्यासाहेब सोनवणे यांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’”