कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून व निर्भीड स्वभावाचे संपादक सुभाष द.घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आणि शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होणाऱ्या ‘साप्ताहिक साक्षी पावन ज्योत’ या वृत्तपत्राच्या कळंब शहरातील दत्तनगर व विद्याभवन हायस्कूल प्रतिनिधीपदी विशाल पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना ओळखपत्र मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी., कार्यकारी संपादक अविनाश घोडके, तीर्थकर एस.एस., पाटील एस.एस., सोनके जे.एस., पवार एस.जे., श्रीमती गाढवे यु.के., घाडगे एस.सी., गुंजाळ एस.ए. आदी मान्यवर उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल विशाल पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी