August 9, 2025

महेश फाटक यांची “सा.साक्षी पावन ज्योत” कळंब शहर प्रतिनिधीपदी निवड

  • कळंब – बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी तसेच शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होणाऱ्या “सा.साक्षी पावन ज्योत” या प्रतिष्ठित वृत्तपत्राच्या कळंब शहर प्रतिनिधीपदी श्री. महेश फाटक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • या निमित्ताने त्यांना अधिकृत ओळखपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी श्री.महेश फाटक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
  • श्री.महेश फाटक यांच्या प्रामाणिक व निःपक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न,स्थानिक समस्या आणि जनतेच्या हक्कांचे प्रतिनिधित्व प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  • याप्रसंगी कार्यकारी संपादक अविनाश घोडके,लोकमत पत्रकार महेश मिटकरी,दैनिक धाराशिव नामा तालुका प्रतिनिधी अशोक कुलकर्णी,महादेव जगताप,पोपट साळवे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!