August 8, 2025

ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना

  • धाराशिव (जिमाका) – ऊसतोडणी व वाहतूक करताना होणाऱ्या अपघातांमुळे ऊसतोड कामगार,वाहतूक कामगार आणि मुकादम यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाच्या उत्पन्नावर परिणाम होतो.अशा परिस्थितीत आर्थिक मदत देण्यासाठी “गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना” राबविण्यात येत आहे.
    या योजनेअंतर्गत ऊसतोडणी,वाहतूक, सर्पदंश,विजेचा शॉक,नैसर्गिक आपत्ती,रस्ते अपघात तसेच इतर कोणत्याही कारणाने झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास मदत दिली जाते.महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांमधील ऊसतोड कामगार,वाहतूक कामगार व मुकादम या योजनेस पात्र आहेत,परंतु लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा,असे आवाहन बाबासाहेब अरवत,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!