कळंब– सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथील मराठी विषय शिकवत असलेल्या श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे –भवर (स्काऊट गाईड कॅप्टन) यांनी इयत्ता ५ ते ९ मध्ये शिकत असलेल्या मुलांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व वाढीस लागण्यासाठी व मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वर्तमान पत्रातील शब्दकोडे सोडवण्याची स्पर्धा घेतली.यांमध्ये एकूण ५० मुला-मुलींनी भाग घेतला त्यामध्ये नववी ब मधील कु.श्रावणी फाटक व कु.आदिती शिंदे प्रथम,श्रावणी लिमकर व आकांक्षा शिंदे द्वितीय,कु.युसरा अबरार सय्यद व प्रणाली चोंदे तृतीय क्रमांक पटकावला . सर्व यशस्वी स्पर्धकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे रणसम्राट क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती मनोरमा शेळके,डॉ.प्रा.बाळकृष्ण भवर ,प्रा.जगदिश गवळी,सुधीर भवर,समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा शिंदे,जिजाऊ ब्रिगेडच्या धाराशिव जिल्हा प्रवक्ता डॉ.मिनाक्षी प्रल्हाद शिंदे- भवर, तालुका अध्यक्षा डॉ.वर्षा जाधव- सरवदे यांनी अभिनंदन केले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन