September 22, 2026

जय भवानी विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

  • पारा – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक एन.बी.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय पारा येथे इयत्ता १० वी वर्गाचा दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करून निरोप देण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक सूर्यवंशी एन.बी. हे होते तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य मधुकरराव ढेंगळे,शंकरराव शेळके,गणित विभाग प्रमुख भराटे एस. डी,श्रीम मेटे एस.व्ही, वाघमारे एस.झेड,मुरकुटे डी. व्ही,माळी व्ही.एस,बांगर ए.बी, मुळे डी.एस,सोलंकर,इतर कर्मचारी गवळी ए.एम,गवळी अतुल,डंबरे तुषार इ कार्यक्रमास उपस्थित होते.तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या दिवशी स्वयं शासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून कुमार सागर मस्के,उप मुख्याध्यापक ओमकार माळी, शिक्षणाधिकारी कु.समीक्षा बागल,उपशिक्षणाधिकारी कु. साक्षी शेळके,मुख्यकार्यकारी अधिकारी समर्थ शिंगणापुरे, गट शिक्षणाधिकारी अमरजीत शेळके,विस्तार अधिकारी ईश्वरी भराटे,केंद्रप्रमुख पूजा चौधरी, लिपिक अरमान सय्यद या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी अधिकारी- पदाधिकारी म्हणून उत्तमपणे काम पाहिले.तसेच इयत्ता १० वी वर्गातील सर्व मुलांनी एक दिवस शिक्षक बनून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम केले.अतिशय आनंदी वातावरणामध्ये विद्यालयात स्वयं शासन दिन साजरा करण्यात आला.
error: Content is protected !!