February 9, 2026

मोहा येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

  • मोहा – गावातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यानंतर उपस्थित मान्यवरांनी माता रमाई यांच्या त्यागमयी जीवनकार्यावर भाषण दिले.या वेळी रमाई यांच्या योगदानाची आठवण करून देत त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
    यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कसबे,विशाल कसबे,महावीर कसबे,गणेश कसबे,राहुल कसबे,प्रवीण कसबे,आकाश कसबे,अश्रूबा नागटिळक,सौरभ मोहोळ,संकेत कसबे,कृष्ण हिरवे व महिलांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!