आष्टा (संघपाल सोनकांबळे) – त्यागाचे नाव आहे रमाई !कधीही न संपणारे पान आहे रमाई ! करुणेचा सागर आहे रमाई ! वात्सल्याची खान आहे रमाई! क्रांती च नाव आहे रमाई! आशेचा किरण म्हणजे रमाई! क्षितिजा च्या पलीकडे नेणारी माय म्हणजे रमाई! हिमालयाच्या उंच शिखरावर पोहचण्याचे धाडस म्हणजे रमाई! डॉ.बाबासाहेबांची शान आहे रमाई ! डॉ.बाबासाहेबांची प्रेरणा आहे रमाई !कष्टच होते गं रमाई !तुझ्या वाट्याला झिजलीस तू आमच्या साठी म्हणून आज सुख आमच्या वाटयाला रमाई! माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या सर्वाना खूप खूप मंगल कामना ह्या व्यक्त करण्यात येत आहेत.
ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे त्यागमुर्ती रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक शिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन करण्यात आले.यावेळी सहाय्यक शिक्षक शशिकांत मांजरे यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सहाय्यक शिक्षक नामदेव अनंत्रे यांनी सूत्रसंचालन केले तर सुजितकुमार जाधव यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूलमध्ये नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (अण्णा) यांना अभिवादन
आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलचा शंभर टक्के निकाल