कळंब ( माधवसिंग राजपूत ) – कळंब येथील सिद्धिविनायक गणपती संस्थांचा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे.दिनांक १ फेब्रुवारी २०२५ माग शुद्ध ३ रोजी श्रीगणे जयंती निमित्त मंदिर संस्थांच्या वतीने श्रीगणेश जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त दुपारी १२ वाजता अभिषेक पूजा महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे गणेश भक्तांनी सिद्धिविनायक गणपती संस्थान च्या माध्यमातून २०१६ मध्ये सिद्धिविनायक श्रीगणेश मंदिर निर्माण कार्य केले आहे.या कार्यात शिव छत्रपती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा या कार्यात पुढाकार आहे.या मंडळाच्या वतीने’प्रतिवर्षी गणेश उत्सव काळात सामाजिक प्रबोधन,विधायक कार्यक्रम घेतले जात असत या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाबा नगर या भागात कायमस्वरूपी श्री गणेशाचे मंदिर बांधणे विषयी निर्णय घेतला व सदभक्त धन्यकुमार अंबुरे यांनी मंदिरासाठी स्वतःची जागा दान स्वरूपात दिली व सदभक्तांच्या मदतीवर मंदिर बांधकाम पूर्ण झाले आहे.शेंदूर लेप असलेली आकर्षक व सुंदर मूर्ती तसेच या मूर्तीच्या डाव्या,उजव्या बाजूला रिद्धी,सिद्धी यांच्या छोट्या मूर्ती आहेत पाठीमागे आकर्षक डिझाईन असलेली रंगाची प्रभावळ भक्तांनी बनवली आहे. मंदिरात नित्य दर्शन पूजेसाठी भक्त येतात तसेच प्रत्येक महिन्याची चतुर्थी व विशेष म्हणजे मंगळवारी येणारी अंगारकी चतुर्थी या दिवशी दर्शनासाठी श्री गणेश भक्तांची गर्दी असते. व्यापार,उद्योग,नोकरी मिळत यामुळे पालकांना आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्यांना बाल वयात योग्य शिक्षण दिले. त्यांच्यावर संस्कार केले तर हे संस्कार जीवनभर शिदोरी म्हणून उपयोगी पडतात परंतु आज धकाधकीच्या जीवनात व धावपळी च्या काळात आपण शालेय शिक्षणावर अवलंबून राहत आहोत कुटुंबातून मिळणारे शिक्षण व संस्कार.आता दुरास्पद झाले आहेत,याचे महत्त्व ओळखून कळंब सिद्धिविनायक मंदिर येथे शिवराज पाटील धानोरकर व त्यांच्या पत्नी महानंदा पाटील तसेच मंदिर पुजारी अक्षय पुरी यांनी दररोज पाच ते १५ या वयोगटातील मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केला असून दररोज ५ ते ६ या वेळेत या मुलांकडून गणपती स्त्रोत्र (संकटनाशक स्त्रोत्र ) श्री गणेश अथर्व शीर्षम, गणपती आरती, मंत्रपुष्पांजली तसेच विविध संस्कृत श्लोक म्हणून घेतले जातात यात सहभागी मुलांचे हे स्त्रोत्र मुखपाठ झाले आहे. यामुळे पाठांतर सवय वाढत आहे त्यामुळे मुलांमध्ये एकाग्रता निर्माण होते व पाठांतर होते योग्य वयात योग्य संस्कार झाल्याने मुलांमध्ये शिस्त, आज्ञाधारकपणा मोठ्यांचा आदर,परोपकार वृत्ती निर्माण होते हे काम या मंदिराच्या माध्यमातून केले जात आहे मंदिराची व्यवस्था हर्षद अंबुरे, बाळासाहेब ठोंबरे,पशुपती पाटील, पुजारी अक्षय महाराज पुरी यांच्याकडे आहे श्री गणेश जन्म उत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर संस्थान कडून करण्यात आले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात