August 9, 2025

कमलाकर शेवाळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

  • कळंब – परिवर्तन सामाजिक संस्था,नळदुर्ग ही संस्था दरवर्षी कला,क्रीडा,साहित्य,समाजसेवा,पत्रकारिता,युवक,शैक्षणिक, कर्तृत्ववान सरपंच,सामाजिक संस्था या क्षेत्रातील बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मानार्थ राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार दिला जातो.
    यापैकी परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५ हा ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षक कमलाकर शेवाळे यांना जाहीर झाला आहे.कमलाकर शेवाळे हे गेल्या २१ वर्षांपासून ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे सेवेत आहेत.
    आतापर्यंत त्यांना २०१८-१९ मध्ये आदर्श शिक्षक ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मोहा,२०२३-२४ – प्रगती सामाजिक संस्था संभाजीनगर राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार, प्रगती सामाजिक संस्था संभाजीनगर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहेत.
    त्यांच्या या यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहकर,प्राचार्य संजय जगताप,प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर व ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!