August 8, 2025

कै.सुमनआई मोहेकर प्रथम पुण्यस्मरण विशेषांकाचे मोहा येथे प्रकाशन

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या शैक्षणिक कार्यात कै.सुमनआई मोहेकर यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ दि.३० जानेवारी २०२५ वार गुरुवारी तालुक्यातील मोहा या गुरुजींच्या मूळगावी गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेल्या “साक्षी पावनज्योत”ह्या पेपरचा “कै.सुमनआई मोहेकर प्रथम पुण्यस्मरण विशेषांकाचे” प्रकाशन हे ज्ञान प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर व ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले.
    या विशेषांकात सुमनआई मोहेकर यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना केलेली मदत,त्यांचे शैक्षणिक योगदान आणि समाजसेवेतील कार्य याबाबत सविस्तर लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
    याप्रसंगी सा.साक्षी पावनज्योतचे कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांनी या विशेषांकाची माहिती देताना सुमनआई मोहेकर यांच्या कार्याचा उल्लेख केला.
    या विशेषांकाच्या माध्यमातून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी आणि त्यांना मिळालेल्या पाठबळाचा ऐतिहासिक दस्तऐवज समाजासमोर मांडला जात आहे.
    याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर,प्राचार्य संजय जगताप,प्रा.सतिश मडके,प्रा.रोहित मोहेकर,कमलाकर शेवाळे,राजाभाऊ चिलवंत, श्रीमती.उषा पांचाळ,सा.साक्षी पावनज्योत कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!