कळंब – तालुक्यातील चोराखळी येथे चक्रवर्ती सम्राट राजराजेश्वर महाराज यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . राज्य अभिषेक दिनाचे औचित्य साधून चोराखळी येथील अंगणवाडी,प्राथमिक शाळा व पापनाश विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते झेलम शिंपले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दत्तात्रय मैंदाड , अंबादास शिंदे,अमोल मैंदाड,अनिकेत मैंदाड,श्रीकांत मैंदाड,पांडुरंग कोकाटे,रामराजे शिंदे,सुधीर मैंदाड ,सुदर्शन मैंदाड, दयानंद साठे,सुशांत सोनटक्के,रेवण मैंदाड,हनुमंत भंडारे,विठ्ठल साठे,किरण शिंदे, शंभू गाढवे,सतीश जगताप,किरण मैंदाड,सुभाष मैंदाड,श्रीराम कोकाटे,बंटी मैदाड यांच्या सह शाळेतील शिक्षक,ग्रामस्थ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले