विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र अन् ‘जय भीम’ घोषवाक्य पुणे (अशोक आदमाने) – कोरेगाव भीमा येथील १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ शौर्यदिनी भारतीय संविधान अमृतमहोत्सव वर्षानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे तेलचित्र त्याचबरोबर ‘अशोकचक्र’ असलेला निळा ध्वज आणि ‘जय भीम’ घोषवाक्य अशी सजावट भीमसैनिकांच्या संकल्पनेतून करण्यात येणार असून,या वर्षी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. याकरिता बार्टी संचालक, निबंधक तसेच जिल्हाधिकारी यांची शासनमान्यता घेण्यात आली आहे.यंदाच्या शौर्यदिनी भारतीय संविधान संविधान व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तैलचित्र त्याचबरोबर ‘जय भीम’ घोषवाक्य आणि निळा ध्वज असा अनोखा संगमस्तंभावर दिसणार आहे. ** अमृत वर्षाचे औचित्य – यंदा विजयस्तंभाची सजावट संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून करण्यात आली असल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, युवराज बनसोडे,विवेक बनसोडे यांच्या वतीने सांगण्यात आले.
More Stories
अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात पुण्यात महाविकास आघाडीची भव्य बाईक रॅली – प्रभाग १७ मध्ये परिवर्तनाचा हुंकार
पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा उघड! पीडित दलित शेतकऱ्यांची ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्याकडे धाव
शिंदे सरकार प्रतिष्ठानाच्या संकेत शिंदे यांची पुणे जिल्हा संघटकपदी निवड