धाराशिव (जिमाका) – सन २०२५ या वर्षातील स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी जाहीर केल्या आहे.सन २०२५ या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या देण्यात आल्या आहे. यामध्ये १७ जानेवारी २०२५ (शुक्रवार) – हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे दर्ग्याचा ऊर्स,१ सप्टेंबर २०२५ (सोमवार) – ज्येष्ठा गौरी पूजन आणि २० ऑक्टोबर २०२५ (सोमवार) – नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान या सुट्ट्यांचा समावेश आहे. या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये,जिल्हा परिषदेअंतर्गत येणारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालये,कोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांनाच लागू राहतील. जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये,केंद्र शासनाच्या कार्यालयांना व बँकांना या सुट्ट्या लागू राहणार नाही.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य