कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने चेअरमन हनुमंत(तात्या) मडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.मोहा शाखा कळंब येथे मल्टीस्टेटच्या दिनदर्शकेचे प्रकाशन व वितरण दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी मल्टीस्टेटचे सभासद,उद्योजक,शेतकरी, व्यापारी यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, eps-95 सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अच्युतराव माने पाटील यांच्या हस्ते व कळंब शाखेचे व्यवस्थापक फुलचंद मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट लि.मोहाच्या महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेर एकूण २६ शाखा असून चेअरमन हनुमंत ( तात्या ) मडके यांच्या उत्कृष्ट नियोजनात व मार्गदर्शनात मल्टी स्टेटची घोडदौड चालू आहे.तत्पर सेवा योग्य नियोजन यामुळे अल्प कालावधीत सभासद ठेवीदार,कर्जदार यांचा विश्वास संपादन केला आहे . लघुउद्योजक,सुशिक्षित बेरोजगार,महिला बचत गट यांना मल्टीस्टेटच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळत आहे.या प्रकाशन व वितरण कार्यक्रम प्रसंगी वसुली अधिकारी राहुल मडके,ज्येष्ठ नागरिक व सभासद अनिरुद्ध पवार,बशीर पठाण, रामभाऊ सोनवणे,एम.डी.शिंदे , सुदर्शन कोळपे,असेफआली सय्यद,बाळासाहेब उमाप, माधवसिंग राजपूत,कळंब शाखेतील रोहिणी कवडे, सोमनाथ कातमांडे,अनिकेत मडके,योगेश मुळे यांच्यासह सभासद यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले