March 26, 2026

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जय भवानी विद्यालयात अभिवादन

  • पारा – बोधिसत्व कायदेपंडित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक एन.बी.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय पारा या प्रशालेमध्ये घर घर संविधान या उपक्रमांतर्गत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी संविधानाबद्दल व्याख्याते कु. अस्मिता अमोल शिनगारे यांना आमंत्रित करून व प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संविधानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
    याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी एन.बी , भराटे एस डी, श्रीमती मेटे एस.व्ही, वाघमारे एस झेड ,मुरकुटे डी व्ही, माळी व्ही एस,बांगर ए बी , मुळे डी एस,पौळ एस एम, गवळी ए एम, डंबरे तुषार व सर्व विद्यार्थी उपस्थित होते .
error: Content is protected !!