शासनाने भूमिहीन कुटुंबांना गायरान जमीन देण्याच्या मागणीवर चर्चा
धाराशिव – भारतीय दलित ऐक्य समितीची बैठक रविवार,१ डिसेंबर २०३४ रोजी धाराशिव येथे घेण्यात आली.बैठकीत समितीच्या विविध पदाधिकार्यांची निवड घोषीत करण्यात आली.तसेच शासनाने भूमिहीन कुटुंबांना गायरान जमीन देण्याच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकर मुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जीवन वनवे,राजाभाऊ शिंदे तसेच महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.रमेश बनसोडे,कॉ.जनार्दन वाळवे, श्रीमंत वाघमारे,सौ.राधाताई शिंगाडे यांच्यासह इतर पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती होती.यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी समितीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ.माधुरीताई क्षीरसागर,महिला जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.आरतीताई नलावडे, कळंब तालुका कार्याध्यक्षपदी मयुर मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत भूमिहीन कुटुंबांना सरसकट जातविरहित गायरान जमीन मिळावी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच याबाबत खा.शरद पवार, आ.राणाजगजितसिंह पाटील, आ.कैलास पाटील यांना विधान भवनात पाठपुरावा करण्याबाबतचे निवेदन देण्यात आल असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.बैठकीस समितीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला