शिवसेना महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारार्थ हजारोंच्या संख्येने पदयात्रा व सभा
कळंब – शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारार्थ दि.१५ नोव्हेंबर २०२४ वार शुक्रवारी रोजी शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सभा संपन्न झाली.
सुरुवातीला छत्रपती संभाजी राजे चौकातून हजारों समर्थकांच्या उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळयास व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास खा.डॉ.श्रीकांत शिंदे,आमदार राणा जगजितसिंह पाटील व उमेदवार अजित पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी महायुती सरकारच्या यशस्वी योजनांची माहिती देत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. खासदार शिंदे म्हणाले,कळंब -धाराशिव मतदार संघाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा एकनिष्ठ व त्यांनी नावाजलेला बालशिवसैनिक असलेला उमेदवार दिला आहे. “महायुती सरकारने कमी कालावधीत राज्यातील जनतेस फायदे होणाऱ्या अनेक योजना राबवल्या आहेत.हे सरकार विकासाला प्राधान्य देत असून, शेतकरी,कामगार,विद्यार्थी, महिला आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने काम करत आहे.मात्र, महाविकास आघाडीचे धोरण हे फक्त सोयीचे राजकारण करण्याचे आहे. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देत अनैसर्गीक आघाड्या करून केवळ सत्तेसाठी एकत्र येऊन राज्याचा विकास रोखला.” श्रीकांत शिंदे यांनी महायुती सरकारने राबवलेल्या योजनांची उदाहरणे देत सांगितले की, या योजनांमुळे ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. “महायुतीचे सरकार सक्षम आणि स्थिर असून, जनतेच्या विकासासाठी कटीबद्ध आहे,” असे ते म्हणाले.त्यासाठीच ह्या सरकारमध्ये सामील होण्यासाठी आपल्या हक्काच्या माणसाला गरिबीची जाण असणारे उमेदवार अजित पिंगळे यांना निवडून द्या.
याप्रसंगी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कमी कालावधीत महायुती सरकारने राज्यातील क्रांतिकारी निर्णय घेतले असून शेतकरी,युवा वर्ग,महिलांना तसेच सर्व घटकांतील नागरिकांची प्रगती होण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत.ह्या सरकारने अडीच वर्षात अडीच हजार कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी दिले असून तुम्ही सर्वांनी उद्या निवडणूकित आपल्या हक्काचा माणूस असलेला अजित पिंगळे यांना विधानसभेत पाठवून आपल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करू द्यावे असे आवाहन केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके म्हणाले की,हे सरकार सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे,खासदार व आमदार यांनी कसलेही विकासात्मक कामे न करता जिल्ह्याचे वाटुळे केले आहे.महायुती सरकारच्या माध्यमातून सामान्य माणसासाठी अनेक जास्त स्वरुपात योजना आणून विकास साधण्यासाठी अजित पिंगळे यांना निवडून द्या असे आवाहन केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी हफ्तेखोर विद्यमान आमदार हे फक्त गोड गोड बोलून स्वतःचा स्वार्थ साधला आहे.कार्यकर्त्यांचा वापर फक्त कामापूरता करायचे अन त्यांना पुन्हा कसलाच त्याला मान सन्मान दयेयचा नाही असा एकपात्री कार्यक्रम त्यांच्याकडून होत आहे.महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या कडून कुठल्याही कार्यकर्त्याला डावलून कोणतेच काम होणार नाही ह्याची मी हमी देतो.त्यासाठी तुम्ही कसल्याही भूल थापांना बळी न पडता भरगोस मतांनी त्यांना निवडून द्यावे अशी विनंती केली.उमेदवार अजित पिंगळे यांनीही सभेत उपस्थितांना संबोधित करत विद्यमान आमदार हे केवळ नाटक करून जनतेसमोर निष्ठावंत असल्याचा आव आणत आहे.जनतेला सर्व शिवसेनेचा जुना इतिहास माहीत असून इतिहास माहित नसलेल्यांनी शहाणपणा शिकवू नये. महायुती सरकारच्या धोरणांवर आपला विश्वास व्यक्त केला आणि जनतेने महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी शिवसेना महायुती,मित्रपक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी सभेत शिवसेनेत अनेक युवकांनी प्रवेश केला.
सभेसाठी मोठ्या प्रमाणावर हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता,ज्यामुळे महायुतीचे वाढते जनसमर्थन स्पष्ट दिसून आले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन