August 9, 2025

भारताचे विद्यापीठ रमाई या महाकाव्याग्रंथाचे प्रकाशन संपन्न

  • धाराशिव – दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी धाराशिव येथे संपादक प्रा.डॉ.अशोक दवणे यांनी संपादित केलेल्या 369 कवीच्या रमाईवरील कवितांचं संपादन “भारताचे विद्यापीठ रमाई” या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झुंज वादळाशी या स्वकथनाच्या लेखिका आशादेवी लष्करे या होत्या त्यांच्या हस्ते या संपादनाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून गोवा इथून आलेल्या सुप्रसिद्ध साहित्यिक मंदाताई सुगीरे व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या विद्याताई वाघमारे या उपस्थित होत्या. त्यांनी या काव्यसंग्रहावर महत्त्वपूर्ण विचार मांडले.खूप मोठ्या परिश्रमाने प्रा.डॉ.अशोक दवणे यांनी रमाईवरील कवितांचे संपादन करून खूप मोठा दस्तावेज वाचकास उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी त्यांचे त्यांच्या भाषणात कौतुक केले. या कार्यक्रमांमध्ये स्वरांजली इंगळे, विराज चंदनशिवे,आदर्श चंदनशिवे, नीलम ठोंबरे हे बालकांनी व प्रा. महेंद्र चंदनशिवे, विजय गायकवाड,धनराज सुगिरे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अनेक महिला उपस्थित होत्या त्यात लीना कांबळे, तनुजा कांबळे,शीतल चंदनशिवे, सुजाता कांबळे, सुकुमार भिसे, रेणुका भिसे, वैशाली इंगळे,पदमीनबाई गायकवाड या सर्व महिला उपस्थित होत्या.
    या महिलांच्या हस्तेच या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. या काव्यसंग्रहामध्ये धाराशिव मधील पंडित कांबळे, अभिमन्यू इंगळे व गोवा येथील मंदा सुगीरे यांच्या कविता आहेत. या कार्यक्रमासाठी रामजी कांबळे,सुमेध कांबळे,पी.के. बनसोडे,अण्णा गायकवाड, सुमेध, सुबोध प्रतीक व अनेक स्त्री-पुरुष यांनी उपस्थित राहून व सहभाग देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित कांबळे यांनी केले तर आभार अभिमन्यू इंगळे यांनी मांडले. चहा पानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
error: Content is protected !!