August 9, 2025

१४ नोव्हेंबरला मतदान जनजागृतीसाठी धाराशिव येथे मानवी साखळी

  • धाराशिव (माध्यम कक्ष) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी १४ नोव्हेंबर रोजी मतदान जनजागृतीचा एक भाग म्हणून सकाळी ९ वाजता धाराशिव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदान जनजागृती कक्ष (स्वीप) यांच्या वतीने मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.या मानवी साखळीमध्ये धाराशिव शहरातील सर्व नागरिक,महिला,दिव्यांग, तृतीयपंथी,ज्येष्ठ नागरिक,शालेय विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते,युवक- युवती व अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन स्वीप कक्षाच्या सहाय्यक नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंके यांनी केले आहे.
error: Content is protected !!