धाराशिव येथे महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारार्थ सभा
धाराशिव – अजित पिंगळे हे कडवट शिवसैनिक असून त्यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर केली.शिवसेनेने सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम केले आहे.धाराशिव-कळंब मतदार संघाचा आमदार म्हणून अजित यांना आपण संधी द्यावी. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अजित पिंगळे यांच्या पाठीमागे मी सुद्धा खंबीरपणे उभा आहे.येत्या २० तारखेला धनुष्यबाण या चिन्ह समोरील बटन दाबून माहितीचे उमेदवार अजित पिंगळे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे,असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केले.
जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची दि.८ नोव्हेंबर २०२४ रोजी शुक्रवारी धाराशिव शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सभा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याने वनवास सोसला आहे.सर्व योजना बंद,प्रकल्प रखडलेले.आम्ही मात्र मागील सव्वादोन वर्षात मराठवाडा, विदर्भाचा दुष्काळ हटविणाऱ्या योजना सुरु केल्या.त्याला बळ दिले.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अडीच वर्षातील कामे दाखवावीत,आम्हीही आमच्या काळातील दाखवू,असे आव्हान देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात नेत्यांनी स्वतःची घरे भरण्याची कामे केली.आम्ही मात्र लाडक्या बहिणीसाठी योजना राबवत जनतेची घरे भरण्याचे काम केले. आता आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना १५०० रुपये नव्हे तर २१०० रुपये देणार आहोत. जनतेला रोटी,कपडा,मकान देण्याचे आमचे धोरण आहे. ते आम्ही राबवले आहे. लाडकी बहिण योजना राबविताना विरोधकांनी अडथळे आणले.न्यायालयात गेले.मात्र, तिथेही त्यांना सणसणीत चपराक बसली.राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी महायुती प्रयत्न करणार असून त्याचा रोडमॅपही तयार आहे.त्यामुळे जनतेने महायुतीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे,असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. व्यासपीठावर भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील,शिवसेनेचे उमेदवार अजित पिंगळे,माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड, जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी