भोगजी – कळंब-धाराशिव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी दि.७ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी भोगजी,बहुला,आढाळा, आडसुळवाडी व खोंदला या गावातील कॉर्नर बैठकीत महायुती सरकारच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, महायुती सरकारने राज्यातील शेवटच्या घटकातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. यावेळी पिंगळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात राज्याचा विकास थांबला आणि त्याचा अनेक स्तरांवर परिणामकारक प्रभाव पडला. महाविकास आघाडीच्या अपयशामुळे राज्यातील सामान्य जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पिंगळे यांच्या या भाषणामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,मतदार संघात महायुतीच्या पक्षाविषयी सकारात्मक लहर पसरत आहे. यावेळी गावातील मतदार, महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात