धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.04 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 170 कारवाया करुन 1,54,900 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-लक्ष्मी माणिक जाधव, वय 40 वर्षे, रा. वत्सलानगर अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव या दि.04.11.2024 रोजी 17.30 वा. सु. वत्सलानगर अणदुर येथे अंदाजे 2,100 ₹ किंमतीची 30 गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-सावित्रीबाई बबु काळे, वय 65 वर्षे, रा. मस्सा खं., ता. कळंब जि. धाराशिव ह.मु. आठवडी बाजार मैदान कळंब ता. कळंब जि. धाराशिव या दि.04.11.2024 रोजी 17.50 वा. सु. कळंब शहरातील आठवडी बाजार मैदाना अंतर्गत असलेल्या एका पत्राचे शेडसमोर अंदाजे 12,250 ₹ किंमतीचे 350 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-नानीबाई सुरेश शिंदे, वय 45 वर्षे, रा. मोहा पारधी पिढी मोहा ता. कळंब जि. धाराशिव या दि.04.11.2024 रोजी 18.10 वा. सु. मोहा पारधी पिढी येथे अंदाजे 10,150 ₹ किंमतीचे 290लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
तुळजापूर पोलीस ठाणे:आरोपी नामे-नितीन सुधाकर जाधव, वय 29 वर्षे, रा. नितीन सुधाकर जाधव, वय 29 वर्षे, रा. भांडेगाव ता. बार्शी जि. सोलापूर हे दि.04.11.2024 रोजी 18.15 वा. सु. तुळजापूर ते सोलापूर जाणारे रोडवर शिवाजी महाराज चौक येथे अंदाजे 7,680 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 48 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-हनुमंत काशिनाथ सोनवणे, वय 45 वर्षे, रा. भोत्रा रोड, भिमनगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे दि.04.11.2024 रोजी 18.40 वा. सु. भोत्रा रोड पाण्याचृया टाकीजवळ परंडा येथे अंदाजे 8,000 ₹ किंमतीची 80 गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
भुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-सुरेश मच्छिंद्र पवार, वय 30 वर्षे, रा.आरसोली ता. भुम जि. धाराशिव हे दि.04.11.2024 रोजी 17.00 वा. सु. आरसोली गावात आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 12,800 ₹ किंमतीची 250 गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-संतोष सुभाष दंडगुले, वय 35 वर्षे, रा. जेवळी उ. ता. लोहाराता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.04.11.2024 रोजी 17.20 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 42,000 ₹ किंमतीचे 500 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे:आरोपी नामे-अनिल चंदु काळे, वय 38 वर्षे, रा.सावरगाव ता.तुळजापूर जि. धाराशिव हे दि.04.11.2024 रोजी 19.00 वा. सु. आपल्या राहत्या घराचे अंगणात अंदाजे 3,700 ₹ किंमतीची 35 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“रस्ता अपघात.”
नळदुर्ग पोलीस ठाणे: मयत नामे-संदीप गुणवंत गंजे, वय 30 वर्षे, रा. चिकुंद्रा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 30.10.2024 रोजी 15.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 बी.वाय. 8678 हे मुर्टा ते होर्टी जाणारे रोडवर सत्यवान सुरवसे यांचे घराचे थोडे पुढे गोविंद किल्लेदार यांच्या शेताजवळून जात होते. दरम्यान छोटा हत्ती क्र एमएच 25 एजे 2286 चा चालक आरोपी नामे-विष्णु वसंतराव काळे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील छोटा हत्ती हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून संदीप गंजे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात संदीप गंजे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कृष्णात मनोहर गंजे, वय 38 वर्षे, रा. चिकुंद्रा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.04.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106 सह 134 (अ), 134 (ब) मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-आनंद सुनिल पवार, रा. इंदीरानगर झोपडपट्टी नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 03.11.2024 रोजी 10.50 वा. सु. खंडोबा मंदीर जाणारे रोडवर फिर्यादी नामे-कल्पना सखाराम गायकवाड, वय 52 वर्षे, रा.इंदीरानगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने उधारी मागण्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कल्पना गायकवाड यांनी दि.03.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) सह अ.जा.ज.अ.प्र.का. कलम 3(1)(आर), 3(1) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
“ लैंगीक अत्याचार.”
बेंबळी पोलीस ठाणे :एका गावातील एक 35 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय मागील सहा महिन्यापुर्वी) व दि. 30.10.2024 रोजी ही घरी असताना गावातील एका तरुणाने तिस लग्नाचे आमीष दाखवून तीच्यावर लैंगीक अत्याचार करुन जातीवाचक शिवीगाळ केली. यावरुन पिडीत यांनी दि. 04.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64(2)(एम),69 अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(1) (आर), 3(1)(एस), 3(1) (व्हि) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील