August 9, 2025

नागरिकांकडे असलेले दस्ताऐवज उपलब्ध करून देण्याचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) मराठा – कुणबी,कुणबी – मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्या.संदीप शिंदे व समिती सदस्य हे 27 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. धाराशिव येथे 27 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.तरी नागरिकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेली दस्तऐवज दुपारी 2 ते दुपारी 4 यावेळेत समिती पुढे सादर करावीत.तत्पूर्वी हे दस्तऐवज द्यायचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
error: Content is protected !!