धाराशिव – दिनांक 24 ऑक्टोंबर 2023 रोजी सुभेदार रामजी आंबेडकर नगर मध्ये सायंकाळी ठिक 7 वाजता भव्य लेझीम मिरवणूक सुभेदार रामजी आंबेडकर नगर मधून आयोजित करण्यात आली होती. तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून नगरसेवक राणा बनसोडे यांच्या वतीने भव्य लेझीम ताफा(वर्ष दुसरे) सुरू करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास धाराशिव शहराचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख,नगरसेवक राणा बनसोडे,सिद्धार्थ बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला याप्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला,युवक् – युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी