पुणे – सामाजिक संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.चिंचवड विधानसभेतून त्यांनी अपक्ष आणि स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना असे दोन उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. २८) दाखल केले.शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अर्ज भरला.अर्ज भरण्यापूर्वी पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकास,महात्मा फुले आणि सावित्री माई फुले,मोरवाडी चौकातील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून भव्य रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष लहू लांडगे,जिल्हा सचिव गणेश कुंजीर,जिल्हा उपाध्यक्ष विजय क्षीरसागर,जिल्हा संघटक अक्षय गायकवाड,पुणे शहराध्यक्ष प्रशांत कुंजीर,पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष दिनेश मराठे,उपाध्यक्ष गणेश मस्के पाटील,संघटक प्रवीण पाटील,सुधीर जाधव,नानासाहेब सकुंडे,संतोष माने,निलेश शेंडगे,सलीम मुलानी,विशाल ढगे,संतोष भोईर आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काळे यांनी अर्ज दाखल केला.
सतीश काळे गेल्या वीस वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरात संभाजी ब्रिगेड संघटनेत कार्यरत आहेत.संघटनेच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर आंदोलन छेडले आहे.या मद्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा.मराठा समाजाला आरक्षण मिळावे.बहुजन महापुरुषांच्या बदनामी विरुद्ध आंदोलन करत असतात.पिंपरी चिंचवड महापालिकेतील पंधराशे कोटींचा टीडीआर घोटाळ्याप्रकरणी काळे यांनी तीन महिने महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले होते. पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाड्यातील रहिवाशांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन काम करत असतात.मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा आंदोलने उपोषणे रास्ता रोको केले आहेत.शहरातील गोरगरीब रुग्णांना मदत करण्यात पुढाकार घेतात.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चिंचवड येथील स्मशानभूमी मध्ये शासनाचा दहावा घालून मुंडन आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. *** स्थानिक नेतृत्वाला बसणार फटका – सतीश काळे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कार्यरत असल्याने विविध सामाजिक,शैक्षणिक,राजकीय क्षेत्रातील अनेकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.शहरासह चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांना मानणारा ४५ ते ५० हजार मतदारांचा समुदाय आहे.तसेच मराठा समाजाबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाजातील युवकांमध्ये देखील त्यांची क्रेझ आहे. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या मतांचा फटका स्थानिक नेतृत्वांना बसेल अशी चर्चा आहे.
More Stories
जनसुरक्षा विधेयकाच्या आडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरवण्याचा सरकारचा प्रयत्न – सतीश काळे
“३०० कोटींचा गूढ व्यवहार… पण माथाडी कायद्याची बदनामी थांबवा!” – डॉ.बाबा आढाव यांची स्पष्ट भूमिका
पंढरीच्या वारीत ‘अर्बन नक्षल’ असल्याचा वक्तव्य करणाऱ्या आ.मनीषा कायंदे यांचा महा.अंनिसच्या वतीने तीव्र निषेध