कळंब – काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी पुर्ण ताकतीने कामाला लागावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने यांनी कळंब तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या आयोजित बैठकीत केले आहे. हि बैठक शहरातील रंगीला चौक येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीसाठी जिल्हा संघटक राजभाऊ शेरखाने,तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार,महिला जिल्हाध्यक्ष ज्योती सपाटे,कळंब शहराध्यक्ष रवींद्र ओझा,धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष भैय्या निरफळ,अँड.दिलीपसिंह देशमुख ,बाबुराव तवले,दौलतराव माने,डिकसळचे उपसरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरीभाऊ कुंभार,डिकसळ ग्रा. प सदस्य सूर्यकांत कदम,अशोक भातलवंडे,अग्निवेश शिंदे, अँड,पृथ्वीराज देशमुख,अंजली ढवळे,मनीषा कुटे,अर्चना नकाते संध्या कदम,वैशाली धावरे,वनमाला म्हेत्रे,आम्रपाली गजशिवे,यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना शेरखाने म्हणाले कि,गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे एकनिष्ठतेने महाविकास आघाडीचे काम करत आहेत.कळंब तालुक्यातील पदाधिकारी यांच्या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे आमदार,खासदार हे जे आपल्या कार्यकर्त्यांनाची कामे झाली नसतील तर त्यांना आपण बोलु व वरिष्ठ पातळीवर हि सांगितले जाईल.काँग्रेस पक्ष हा स्वाभिमानी पक्ष आहे. आपल्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळालाच पाहिजे.गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघातील आमदार कैलास पाटील हे काँग्रेस पक्षातील पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत.आपल्या कार्यकर्त्यांची कामाची जान राखीत नाहीत.त्यामुळे यापुढे जर आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मान सन्मान राखला जाईल याची दक्षता घेण्यास सांगितले जाईल . प्रतिक्रिया गेल्या पाच वर्षांपासून या मतदारसंघातील आमदार कैलास पाटील यांनी कोणत्याही काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना गृहीत न धरता त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा विचार त्यांनी केला.धाराशिव लोकसभेच्या वेळेला काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकनिष्ठतेने काम करून खासदार याना मोठे मताधिक्य दिले पण याची जान या पक्षातील नेते ठेवत नाहीत त्यामुळे काँग्रेस पक्षाने वेगळा विचार करावा असे मत अँड.दिलीपसिंह देशमुख यांनी यावेळी मांडले आहे. चौकट आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निधी वाटपाच्या बाबत विचारणा केली नाही तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारपूस देत व मान सन्मान देत नाहीत अशा विचाराच्या आमदाराचे काम करायचे असेल तर त्यांनी काँग्रेस पक्षातील सर्व सामान्य कार्यर्त्यापासून ते पदाधिकारी यांचा चांगली वागणूक देत असतील तर या निवडणुकीत आ.कैलास पाटील काम करा अन्यथा काम करु अशी मागणी कार्यकर्त्यांनी या बैठकीत केली आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात