August 9, 2025

कॅन्सर शिबीर संपन्न

  • कळंब – रोटरी क्लब,इनरव्हिल क्लब आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कळंब शाखेच्या वतीने कै.सौ.विजयाताई रामकृष्ण लोंढे यांच्या स्मरणार्थ शनिवार दि १९ ऑक्टोबर २०२४ रोजी मोफत कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
    सदरील शिबीर नियमित पणे घेतले जात असून यावर्षी शिबीराचे दहावे वर्षे आहे. शिबीरार्थिंची बार्शी येथील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल च्या तज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली.कॅन्सर संशयित पेशंटचे पॅप स्मियर घेऊन लॅबोरेटरी कडे तपासणी साठी पाठवण्यात आले.काही पेशंटला पूढील चाचण्या साठी बार्शी येथे बोलावण्यात आले आहे.
    या शिबिराला जोडूनच कॅन्सरच्या जनजागृतीसाठी कॅन्सर ग्रस्त पेशंटचे रंगीत पोस्टर प्रदर्शनी आयोजित केली होती.त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त दिसून आला.
    यावेळी कॅन्सर रोखण्यासाठी पन्नास वर्षांपुढील सर्व स्त्री पुरुषांनी नियमित पणे आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी नवू ते चौदा वर्षे वयोगटातील मुलींना एच.पी. व्ही ( ह्युमन पॅपीलोमा व्हायरस) लसीकरणाचे दोन डोस सहा महिने अंतराने देणे आवश्यक आहे.सद्या लस महाग असल्याने सार्वजनिक लसीकरण करण्यास मर्यादा येतात.परंतु लस उत्पादक कंपनी बरोबर संपर्क करून समाजातील दानशूर व्यक्तींना बरोबर घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशन,रोटरी व इनरव्हिल सारख्या नावाजलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थांच्या पुढाकारातून ही लसीकरणाची मोहीम यशस्वी पणे राबवली जाईल आणि कॅन्शर वर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल असे डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी शिबीरार्थिंना संबोधीत करतांना मत व्यक्त केले.
    शिबिराच्या यशस्वितेसाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ.मंजुराणी शेळके,रोटरी अध्यक्ष रो.अरविंद शिंदे,सचिव रो.पापा काटे, इनरव्हिल अध्यक्षा डॉ.प्रतिभा भवर,सचिव डॉ.प्रियंका आडमूठे, प्रकल्प प्रमुख डॉ.दिपाली लोंढे, रो.संजय घुले,रो.धर्मेंद्र शाहा,रो. मांडवकर नाना,डॉ.सत्यप्रेम वारे, डॉ.अभिजित लोंढे,डॉ.सुधीर आवटे,डॉ.सुयोग काकानी,डॉ. शरद दशरथ,संगीता घुले,डॉ.मेघा आवटे,वर्षा जाधव,ज्योती पवार, राजश्री देशमुख,प्रफुल्लता मांडवकर,आनंद रणदिवे,संभाजी कोळी,सुनील लिके-पाटील,टाटा मेमोरिअल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी चे तज्ञ आदींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!