August 11, 2025

भीमनगर मध्ये वर्षावास समाप्ती व बुद्ध आणि धम्म ग्रंथाच्या वाचन समारोप

  • कळंब – भिमाई महिला मंडळाच्या वतीने भीमनगर बुद्ध विहार मध्ये वर्षावास समाप्ती व बुद्ध आणि धम्म ग्रंथाच्या वाचन समारोप प्रसंगी शांतीदुत तथागत महाकारूणीक भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून महामानवास अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी भिमाई महिला मंडळाचे अध्यक्ष सुनंदा गायकवाड,विमल गायकवाड नीता बचुटे,यमनबाई हौसलमल यांच्यासहित मोठ्या संख्येने बौद्ध उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना खीर वाटप करण्यात आले.
error: Content is protected !!