February 9, 2026

संकट काळात योग्य आर्थिक नियोजन व भविष्य निर्वाह निधी महत्वाची – डॉ.अशोक मोहेकर

  • कळंब – संकटाच्या काळात आणि रुग्णालयातील उपचारांच्या वेळी भविष्यातील निर्वाह निधी अत्यंत महत्त्वाचा ठरतो.त्यासाठी संकट काळात योग्य आर्थिक नियोजन व भविष्य निर्वाह निधी महत्वाची आहे असे प्रतिपादन ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी केले.
    शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात दि.१७ ऑक्टोबर २०२४ रोजी भारतीय जीवन बीमा निगमच्या वतीने एक दिवसीय शिबीर घेण्यात आले.
    त्यावेळी डॉ.मोहेकर हे बोलत होते त्यांनी पुढे म्हणाले की,प्रत्येक व्यक्तीने भविष्यासाठी योग्य योजनाबद्धता करणे आवश्यक आहे, ज्यामुळे ते कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत सुरक्षित राहू शकतील.भविष्य निर्वाह निधीमुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक ताणतणाव कमी करण्यास मदत केली आहे. रुग्णालयातील खर्च सहन करणे अधिक सोपे होते.
    हा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी संस्थेतील प्राध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांनी जनजागृती साधण्याचे आवाहन केले.
  • यावेळी शाखा अधिकारी भारत चोरघडे यांनी विमा,बचतीचे महत्त्व सांगून विमा आणि बचतीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.त्यांनी असे सांगितले की, विमा एक आर्थिक सुरक्षा कवच आहे, ज्यामुळे अनपेक्षित घटनांमध्ये आर्थिक स्थिरता मिळवता येते.
    विमा योजनांमुळे व्यक्तींना आरोग्य,संपत्ती,आणि आयुष्याच्या संरक्षणाची सुविधा मिळते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांचे भवितव्य सुरक्षित होते. बचतीसाठी योग्य योजना निवडणे देखील अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितींमध्ये आर्थिक ताण कमी करता येईल तर प्रशासकीय अधिकारी असद खान यांनी विमा व बचतीच्या योजनांचा उपयोग करून आपला आर्थिक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तयारी कशी करावी हे सांगितले.
    याप्रसंगी प्राचार्य डॉ.सुनील पवार,साहाय्यक श्रीकांत तिकोणे,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,सा.साक्षी पावनज्योत संपादक अरविंद शिंदे सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
    या शिबिराचे सूत्रसंचालन सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव यांनी केले.
error: Content is protected !!