August 9, 2025

मांजरा काठ… कळंब न.प. करते तरी काय ?

  • कळंब -शहरात वाढत चाललेले घाणीचे साम्राज्य आणि विविध अडचणी याबद्दल नगर परिषद प्रशासन लक्ष देत नसल्याने युवक काँग्रेस च्या वतीने बॅनरबाजी करून शहरात फलक झळकावले आहेत.
    कळंब न प वर सध्या प्रशासन कारभारी असल्याने या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पदाधिकारी नसल्याने सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
    कळंब न प प्रशासन नागरिकांकडून कर वसुली करण्यासाठी मोठी धडपड असते. मात्र त्याच नागरिकाने सुविधा पुरवण्यासाठी न. प. प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नगर परिषद काय करते ? बघा आणि शांत राहा अशा नावाचे बॅनर करून कळंब शहरात पार्किंग ची झालेली दुरावस्था ,बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरून शहरातील घाण पाणी वाहत आहे.तर आठवडी बाजारावर कोट्यवधी रुपये खर्च देखील अस्वच्छता दिसत आहे.शहरात इ टॉयलेट चे सुशोभीकरण केले असून याचा उपयोग कुणासाठी केला जातो ,शौच्चालयाचे दरवाजे नसल्याने याकडे कुणी लक्ष द्यायचे ?, जलशुद्धीकरण फक्त दिखाव्यासाठी उभे केले असून याचा उपयोग कुणासाठी होतो ?तुंबलेल्या नाली,पोलवरील लाईट बंद असे अनेक समस्यांचे फलक युवक काँग्रेस च्या वतीने बसवण्यात आले असून न प प्रशासन याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • कळंब शहरातील विविध समस्या काय आहेत याचे फलक युवक काँग्रेस आय चे कळंब धाराशिव विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ यांनी लावले असून, प्रशासनाला प्रश्न विचारला आहे.
    =========
    सतीश टोणगे
    9422936081
error: Content is protected !!