धाराशिव (जिमाका) – जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेअंतर्गत प्रसिध्द झालेल्या लाभार्थ्यांच्या यादीतील काही शेतकरी मयत झाल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा मयत लाभार्थ्यांच्या वारसांना लाभ देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे.वारसाची माहिती अपलोड करण्यासाठी योजनेचे पोर्टल ७ ऑक्टोंबर-२०२४ पर्यंत चालु करण्यात आले आहे. तरी योजनेअंतर्गत मयत लाभार्थ्यांच्या वारसांनी त्यांचे बैंक शाखेस संपर्क करुन आपली माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करुन घ्यावी.असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी