धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीजींच्या तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीजींची आश्विन शुक्ल ३ शके १९४६ रविवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी नित्योपचार पूजा करण्यात आली.शारदीय नवरात्राची आज चौथी माळ आहे. तत्पूर्वी आज पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत देवीजींची अभिषेक पूजा करण्यात आली.त्यानंतर आरती झाली.पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पूर्ण केले जातात. तत्पूर्वी रात्री ५ ऑक्टोबर रोजी तिसऱ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आले.त्यानंतर धूप आरती करण्यात आली.रात्री श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंदिरात गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.यावेळी प्रक्षाळ पूजा करण्यात आली.राज्यासह विविध राज्यातून आलेले भाविक मोठ्या भक्तिभावाने या मिरवणुकीत सहभागी झाले.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी