September 20, 2026

भारतीय सशत्र सैन्य दलात अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

  • धाराशिव (जिमाका) – भारतीय सैन्यदल,नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी (SSB) या परीक्षेची पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र,नाशिक रोड,नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी १४ ऑक्टोबर २०२४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत SSB कोर्स क्रं.५८ आयोजित केले आहे.कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण,निवास व भोजन दिले जाते.
    जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune(DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करून त्यामधील SSB-५८ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परीशिष्ठांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे. एस.एस.बी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमुद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे.व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत.
    कंम्बाईड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेच असावे.एन.सी.सी. ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेडमध्ये पास झाले असावे.एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस.एस.बी साठी शिफारस केली असावी.टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
    अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी,छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड,नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com दुरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. ९१५६०७३३०६ हा असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!