कळंब – आज कळंब तालुक्यातील चार तरूण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि त्यातल्या त्यात तालुक्यातील घारगाव येथील डॉ.महेश घाटुळे हा राज्यात प्रथम येतो.हा मराठी माणसांचा अभिमानच असल्याचे गौरवोद्गार मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी काढले. शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व आमदार विक्रम काळे यांना उत्कृष्ट भाषणपटू म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते सत्कार झाल्याबद्दल सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे,साहित्य परिषदेचे नितीन तावडे,जिल्हा उपाध्यक्ष अतुल गायकवाड,माजी कुलगुरू मधुकर गायकवाड,शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, माजी उपसभापती गुणवंत पवार, अँड प्रविण यादव, तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे, शहराध्यक्ष दत्ता तनपुरे,तालुका कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड, जिल्हाउपाध्यक्ष राहुल हौसलमल,अंकुश नाडे, दौलतराव माने,दिलीप लोमटे, महीला जिल्हाध्यक्षा सरला खोसे,मुसददीक काझी, राजकुमार मेढेकर,बालाजी इतबारे,बालाजी तांबे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना काळे म्हणाले की, राज्यात पहीला आलेला डॉ.महेश घाटुळे याच्या घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळालेले असुन त्यामुळे तो कुठलेही क्लासेस न लावता यशस्वी झाला आहे. आपल्या जिल्ह्यातील व मराठवाडयातील मुले ही स्पर्धा परीक्षेमध्ये बाहेर राज्यातील असलेल्या लोकांची मक्तेदारी मोडून काढत आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. माझा देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट भाषणपटू म्हणून सत्कार झाला हा सत्कार माझा नसून माझ्या मराठवाड्यातील शिक्षक व शेतकरी कष्टकऱ्यांचा आहे. मला मराठवाड्यातील शिक्षकांनी चार वेळा विधानपरिषदेत पाठवले पण मी शिक्षकांचे प्रश्न तर मांडलेच परंतू मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सुध्दा मांडले. महायुती सरकारने लाडकी बहीन सोबतच,विज बिल माफ,मुलीना मोफत शिक्षण यासारखे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा धाराशिव कळंब मतदारसंघ मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. जर मिळालाच तर आपण जो उमेदवार मिळेल त्याला निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शिवाजी लकडे व स्वागतपर भाषण अँड.प्रविण यादव यांनी केले. सुत्रसंचालन शंतनु खंदारे यांनी केले तर आभार दामोदर शिंदे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
** यांचा झाला सत्कार – महाराष्ट्र राज्य मुखयसेवा परीक्षेत तालुक्यातील घारगाव येथील डॉ महेश अरविंद घाटुळे हा राज्यात प्रथम तर सापनाई येथील अशोक संजय बाराखोते,मस्सा येथील प्रशांत बापूराव इंगोले, करंजकला येथील रोहित चंद्रकांत पवार यांचा आमदार विक्रम काळे व उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
** काळे यांना मंत्री म्हणून पहायचय – मधुकर गायकवाड
आमदार विक्रम काळे यांना काळे मराठवाड्यातील शिक्षकांनी सलग चार वेळा निवडून दिले परंतु विधानपरिषदेचे आमदार म्हणून की काय आतापर्यंत मंत्रिपद मिळाले नाही. परंतु आता शिक्षकांसोबतच सर्वानी प्रयत्न करू आणि त्यांना मंत्रिपदी विराजमान करु असे आवाहन त्यांनी केले. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस ला जागा सुटल्यावर आमदार विक्रम काळे विधानसभेच्या आखाडय़ात उतरणार असेच संकेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू मधुकर गायकवाड यांनी दिले.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर