February 9, 2026

महायुती सरकारसाठी शक्तीपद यात्रेचे आयोजन – अजित पिंगळे

  • कळंब – कल्याणकारी महायुती चे सरकार हा पुन्हा सत्तेत यावे या करीता तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यासाठी शक्तीपद यात्रा कळंब येथून काढण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी दिले आहे.
  • महाराष्ट्रामध्ये गेली अडीच वर्षापासून अनेक लोककल्याण कारी योजना राबवत असणारे एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार पुन्हा सत्तेत यावे यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीस साकडे घालण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी रोकडेश्वरी मंदिर खामसवाडी येथून शक्ती पदयात्रा सुरुवात करण्यात येत आहे. मोहा मार्गे दहिफळ, परतापुर पानगांव मार्गे येरमाळा येथे मुक्काम, दिनांक ६ अॉक्टोबर येडेश्वरी मंदिर येथुन प्रस्तान येडशी मुक्काम, दिनांक ७ ऑक्टोबर सकाळी येडशी येथुन प्रस्थान,एम,आय,डी,सी धाराशिव भोजन धारासुर मर्दिनी देवी मंदीर दर्शन,धाराशिव मुक्काम. दिनांक ८ ऑक्टोबर सकाळी धाराशिव येथुन प्रस्थान सिद्धेश्वर मंदिर वडगांव (सि) ता. धाराशिव, कावलदरा तर दुपारी ४ वा माता तुळजाभवानी दर्शन आरती व समारोप होणार आहे.
    यावेळी दरम्यान पालकमंत्री तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार तथा भाजपाचे नेते सुजितसिंह ठाकूर, माजी खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौघुले, माजी आमदार बसवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार हे भेट देणार आहेत. अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांनी दिली आहे.
    यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,भाजपा शहराध्यक्ष शितल चोंदे,रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजी सिरसट, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक अरुण चौधरी,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विकास कदम आदी उपस्थित होते.
    यावेळी राहुल चव्हाण,भाजपा सरचिटणीस माणिक बोंदर, प्रदीप फरताडे,डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला, सुमित रणदिवे,सुरेश वेदपाठक, रोहित मुंडे,रोहित शेळके,राहुल चोंदे,युवराज पिंगळे आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!