धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 25 ऑक्टोबर ते 7 डिसेंबर दरम्यान युवा संघर्ष पदयात्रा पुणे ते नागपूर अशी होणार आहे. यामध्ये युवा वर्गाच्या समस्याबाबत सरकारविरोधात आवाज उठवला जाणार असून यामध्ये मोठ्या संख्येने युवा सहका-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे. डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,आपल्या राज्यात बेरोजगाराचा वाढता दर,परीक्षा आयोजित करण्यात दीर्घकाळ होणारा विलंब,पेपर फुटी, आवाजवी परीक्षा शुल्क,रोजगार उपलब्ध करू शकणारे राज्याच्या हक्काचे मोठे मोठे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणे या आणि इतर असंख्य समस्यांनी युवांचे भविष्य धोक्यात आले आहे. यासाठी युवांनी एकत्र येऊन सरकारला युवा कल्याणकारी धोरणे आखण्यास तसेच अतिशय महत्त्वाच्या अशा तरुण पिढीच्या आकांक्षा आणि कल्याणासाठी स्पष्टपणे अनुकूल निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी ,ही यात्रा ही पदयात्रा आयोजित केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या यात्रेचा प्रारंभ पुणे येथे 25 ऑक्टोबर रोजी होणार असून त्याचा समारोप नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी होणार आहे.ही पदयात्रा एकूण 42 दिवस असून यामध्ये जवळपास 800 किलोमीटर इतकं अंतर पायी चालून पूर्ण करणार आहेत.ही यात्रा आपल्या धाराशिव जिल्ह्यात येणार नसली तरी देखील आपल्या जवळ असणा-या राशीन,धोंडेवाडी ता.कर्जत चौंडी, जिकरी, साकत ता.जामखेड रोहतवाडी फाटा ता.पाटोदा राजुरी साखर कारखाना ता.बीड येथे येणार आहे.यावेळी तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी