कळंब :- विजयादशमीचा सण सर्व देशभlर मोठ्या उत्साहाने साजरा होतो प्रभू रामचंद्रने रावणावर मिळवलेला विजय असो की आई भवानीने महिषासुराबरोबर नऊ दिवस युद्ध करून मिळवलेला विजय ,उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो यानिमित्त आयुध पूजन केले जाते तसेच नवीन पोशाख परिधान करून टोपीला अथवा फेट्याला घरातील घटस्थापनेतील धान्याचे तृण (तुरा ) लावून गावांगावांत मिरवणुकीने सिमाेलंघन करण्यात येत असे यानिमित्त आपट्याची पाने (सोने ) देऊन भेटीगाठी घेण्याची प्रथा आहे कळंब शहरात आर्य समाजाच्या झेंड्याखाली एकत्रित येऊन विजयादशमीची मिरवणूक सिमोलंघन करण्यात येत असे स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबादस्टेट मध्ये निजामाचे राज्य होते यामुळे संघटित मिरवणुकीवर बंदी असायची ही बंदी झुगारून देऊन मिरवणूक निघायची कळंब येथे १९२७ साली स्वातंत्र्य सेनानी गणपतराव कथले यांनी आर्य समाजाची चळवळ सुरू केली व गावा़ंगावांत आर्य समाजाच्या शाखा स्थापन केल्या लोक गणपतराव कथले यांच्या नेतृत्वात एकत्रित येऊ लागले व कळंब मध्ये आर्य समाजाच्या झेंड्याखाली विजयादशमी मिरवणूक व सिमोलंघन होऊ लागले कळंब शहरातील आर्य समाज मंदिर कसबा पेठ येथून ही मिरवणूक निघत असे या मिरवणुकीत वैदिक धर्म की जय ! ओमका झेंडा उंचा रहे! आर्य समाज अमर रहे! स्वामी दयानंद सरस्वती की जय ! भारत माता की जय ! अशा घोषणा दिल्या जात ही मिरवणूक वाजत गाजत कळंब शहराच्या बाहेर असलेल्या पटांगणात आजचे क्रीडा संकुल येथे येत असे या ठिकाणी शेतातील पिवळी ज्वारी, सजगुरा (बाजरी ) तसेच मोठे कारळे (सूर्यफूल )ही उंच वाढणारी कणसे असलेली पिके त्याची कोपी करून धान्याचे कणीस व शमीच्या झाडाची पाने (सोने ) म्हणून याची वैदिक धर्माच्या मंत्र उच्चारात पूजा केली जात असे पूजेनंतर हे लुटलेले सोने (आपटा )एक मेकान देऊन शुभेच्छा दिल्या जात या मिरवणुकीत आर्य समाज चे गोपीनाथ माळवदे, एकनाथ वेदपाठक देव दत्ताजी मोहिते ( वकील) काशिनाथराव पाटील (वकील ) डॉ. दिगंबर आप्पा मिटकरी, गोविंदराव दशरथ ,रेवनसिद्धाप्पा भडंगे, परशुराम लोहार, दिगंबर पुरी , शंकरराव शिवणकर ,साहेबसिंग खालसा ,मारुती मास्तर हारकर , येडाबा जंत्रे शंकरराव देवद्वारे ,अंबादासराव जोशी, महादेव मास्तर यांचा पुढाकार असे ही प्रथा बंद होऊ नये म्हणून १९७५ ते १९८० या कालावधी आर्य समाजाचे मंत्री असलेले भीमराव (दादा) पांचाळ यांनी पुढाकार घेऊन विजयादशमी मिरवणुकीत वैदिक धर्माचे शिक्षण देणारी संस्था गुरुकुल येडशी या संस्थेचे संस्थापक आचार्य सुभाषचंद्र यांच्याशी संपर्क केला व त्यांनी कळंब मधील या उत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारून गुरुकुल मधील ५० विद्यार्थी व त्यांचे सहकारी धर्ममुनी आणि वैदिक धर्माचे शिक्षण देणारे शिक्षक यांनी सतत पाच वर्ष दरवर्षी कळंब येथे येऊन वैदिक धर्माप्रमाणे विजयादशमी मिरवणूक व पूजेत सहभाग नोंदवला कळंब शहरातील आर्य समाजाचे शिवाजीराव कथले ,वेद प्रकाश हारकर,रामलींग त्रिमुखे, आत्माराम गुंजाळ ,प्रा. अरुण शेळके माणिकराव भवर ,भिमराव पांचाळ व गावातील लोक सहभागी असत १९८० नंतर मात्र ही समाजाची मिरवणूक प्रथा बंद झाली आहे काळाच्या बदलाबरोबर काही प्रथा व परंपरा बंद पडत आहेत कळंब शहरात फक्त आपट्याची पाने लुटलेले सोने एकमेका देऊन हा सण साजरा केला जातो ग्रामीण भागात मात्र परंपरेप्रमाणे हा उत्सव सण साजरा होताना दिसून येतो.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात