धाराशिव (जिमाका) – तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे वाढते सेवन, त्याचे मानवी शरीरावार होणारे दुष्परिणाम,व्यसनाधीन झालेल्या लोकांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २४ सप्टेंबर रोजी तंबाखु मुक्ती केंद्र सुरु करण्यात आले.या केंद्राचे उद्घाटन वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ.विश्वजीत पवार, जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.धाबे,डॉ.मुंढेवाडी,शरीरक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ.हेमलता रोकडे,समन्वय अधिकारी तथा विभागप्रमुख जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख,सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ.हलगकर,डॉ.सिद्दिकी,डॉ.मोहन राऊत, डॉ.गणेश ताठे,डॉ.स्वप्निल सांगळे, डॉ.क्षितिजा बनसोडे,डॉ.चेतन राजपूत,डॉ.विजयालक्ष्मी,डॉ.विवेक कोळगे, डॉ.दिपक निभोरकर यांच्यासह केंद्रे,तंबे, सैय्यद खय्युम,सचिन सतदिवे,अटकळ, प्रणाली सातदिवे हे समाजसेवा अधीक्षक उपस्थित होते.सूत्रसंचालन डॉ. नागेश वाघमारे यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला