धाराशिव (जिमाका) – प्रतिवर्षाप्रमाणे दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल परवानगीचे अर्ज मागविण्यात आले आहे.26 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत.असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी केले आहे.अर्ज सादर करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज,फॉर्म LE-5, आधारकार्ड, पॅनकार्ड,मतदान ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र, संबंधित ग्रामपंचायत/नगर परिषदेचे/ नगर पंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र, साक्षांकित नकाशा (संबंधित ग्रमापंचायत/नगर परिषदचे/नगर पंचायतचे),संबंधित जागा खाजगी असेल तर जागामालकाचे नाहरकत व जागेचे कागदपत्र,संबंधित पोलिस स्टेशन/पोलिस ठाणे यांचे नाहरकत प्रमाणपत्र,विहित परवाना फीस भरणा केल्याचे चालन सादर करावे. असा परिपूर्ण असलेले अर्ज कार्यालयात सादर करावेत.विहित दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचेही अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी कळविले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान