June 21, 2025

जनकल्याणच्या सभासदांना ६% लांभाश जाहीर

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – कळंब शहरातील जनकल्याण अर्बन को-ऑप बँकेची दि.२२ सप्टेंबर २०२४ रविवारी २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी बैंकेचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी सभासदांना ६% लांभाश जाहीर केला आहे.
    याबाबत वृत्त असे की, कळंब शहरातील जनकल्याण अर्बन को-ऑप बँक लि. कळंब या बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे संस्थापक उमेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. दिपप्रज्वलनाने वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम मागील आर्थिक वर्षात सीमेवरील जवान, राजकारणी, साहित्यिक तसेच इतर क्षेत्रातील ज्ञात-अज्ञात जे पंचतत्वात विलीन झाले अशांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. नंतर बँकेचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले. यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले की,जनकल्याण बँकेत IMPS, UPI सुविधा online Banking तसेच ATM कार्ड, फोन पे, गुगल पै- इत्यादी सेवा उपलब्ध झाल्या असून ग्राहकांना याचा खुप फायदा होत आहे. ज्यांनी आणखी या सेवेचा वापर चालु केला नसेल त्यांनी ताबडतोब बँकेच्या शाखेशी संपर्क साधुन सेवेचा फायदा करून घ्यावा असे आवाहन केले.तर जनकल्याण बँकेच्या लातुर धाराशिव व कळंब या तीन शाखेत फ्रैंकिंग ची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जनकल्याण बैंकेच्या सभासदांना ६% लाभांश जाहीर करत चेअरमन कुलकर्णी म्हणाले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे सर्व निकष तंतोतंत पालन करणारी बँक आहे. गतवर्षात बार्शी (जि. सोलापूर) येथे बँकेची नवीन शाखा चालू करण्यात आली आहे. तर या वर्षांमध्ये मुरुड (जि. लातूर) येथे लवकरच शाखा विस्तार होणार असल्याचे सांगितले. यावेळी बँकेचे संचालक महेश जोशी यांनी २८ वर्षापूर्वी जनकल्याण बँकेची स्थापना समाजसेवा या भावनेतून झाली गत २८ वर्षात बैंकेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बैंकेने समाजसेवेच्या बरोबरीने धाराशिव लातूर, बीड व सोलापुर या जिल्हयांमधे आपल्या बँकेच्या शाखांचा विस्तार झाला आहे. हेच यशाचे गमक आहे.
    सर्वसाधारण सभेचे सुत्रसंचालन बैंकेचे मुख्य आधिकारी विश्वनाथन पेक्कमवार तर बैंकेचे जेष्ठ संचालक प्रा. मानकरी यांनी आभार मानले. यावेळी बैंकेचे संचालक, राजेंद्र दीक्षित, विजयकुमार पाटील, महेश जोशी, सुधीर धोकटे, सभासद रामलिंग आवाड, विनायक आवाड, विजय सांजेकर, श्रीकृष्ण देशपांडे, रोहीत वेदपाठक सर्व शाकाधिकारी व कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.
error: Content is protected !!