धाराशिव (जिमाका) – उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीमधील सुधारणा करण्याच्या संबंधाने जिल्हयातील सर्व पथसंस्थांची बैठक २० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील डी.पी.डी.सी सभागृहात होणार आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समितीची नियुक्त केलेली आहे.या समितीने बँकेच्या कामकाजामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने जिल्हयातील सर्व नागरी पतसंस्था,मल्टीस्टेट,नागरी बँक व पगारदार सहकारी संस्थाना व्यवहार पुर्ववत होण्याच्या दृष्टीकोनातून कायदेशीर अडचणी व त्यावरील उपाययोजनांचे संबंधाने चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस जिल्हयातील सर्व नागरी पतसंस्था,मल्टीस्टेट,नागरी बँक व पगारदार सहकारी संस्थाचे प्रतिनिधी, अध्यक्ष,कर्मचारी यांनी बैठकीस उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा बँक सनियंत्रण समिती,उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालकाचे वतीने जिल्हा उपनिबंधक तथा समिती सचिव बालाजी काळे,मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे यांनी केले आहे.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन