August 9, 2025

डॉ.संदीप शीलवंत यांचे यश

  • कळंब – शहरातील यशवंत नगर येथील रहिवासी डॉ.संदीप सुरेंद्र शीलवंत यांनी पहिल्याच प्रयत्नांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दि.२६ डिसेंबर २०२२ रोजी घेतलेल्या परीक्षेत पशुधन विकास अधिकारी वर्ग-१ यश प्राप्त केले आहे.
    डॉ.संदीप शीलवंत यांचे प्राथमिक शिक्षण हे कळंब शहरातील ज्ञान प्रसारक मंडळ संचलित विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे झाले असून माध्यमिक शिक्षण धाराशिव येथील श्रीपतराव भोसले हायस्कुल येथे झाले तर उच्च माध्यमिक फर्ग्युसन कॉलेज,पुणे येथे झाले आहे.पशु वैद्यकीय पदवी क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ जि.सातारा येथे झाले असून पंजाब राज्यातील लुधियाना येथील गडवासू ॲनिमल सायन्स ह्या महाविद्यालयातून पशुवैद्यकीय अभ्यासक्रमातून पदव्युत्तर प्राप्त केली आहे.
    कसलाही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता डॉ.संदीपने स्वयं अभ्यासातून हे यश प्राप्त केले असल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    कळंब शहरातील सामाजिक व धम्म कार्य करणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व असणारे आयु.शीलवंत बप्पा यांचे डॉ.संदीप हे नातू असून त्यांच्या यशात बप्पांचा सिंहाचा वाटा आहे.
error: Content is protected !!