कळंब – राष्ट्रीय चर्मकार महासंघाची कळंब तालुका कार्यकारिणी दि.१६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड,राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. जालिंदर लोहकरे,परभणी जिल्हाध्यक्ष मुरलीधर ठोंबरे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम होते. सुरुवातीला धाराशिव उपाध्यक्षपदी रंगनाथ कदम व जिल्हा सल्लागारपदी महादेव ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांनतर अशोक लाड कळंब तालुका अध्यक्ष,डॉ. संजित पाखरे उपाध्यक्ष,प्रमोद नरहिरे संघटक,शिवाजी शिंदे सल्लागर,परमेश्वर कदम सहसचिव,जनार्दन शिंदे सल्लागार,बळीराम बोबडे सहसचिव,तर युवा कार्यकारणीत सतीश कदम युवक तालुकाध्यक्ष, सुहास कदम सचिव व प्रा.अभिजीत बोबडे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी