March 26, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.09 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 192 कारवाया करुन 1,62,200 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.09.09.2024 रोजी 16.30 वा. सु.उमरगा पो ठाणे हद्दीत तलमोड चेक पोस्ट जवळील राजु पाटील यांचे शेतात रोडच्या बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-शिवराज राजन्ना तेलंग, वय 48 वर्षे, रा. धर्मा चौक, लक्ष्मी टाकीजच्या बाजूस बस्वकल्याण ता. बस्वकल्याण जि. बिदर हे 16.30 वा. सु. तलमोड चेक पोस्ट जवळील राजु पाटील यांचे शेतात रोडच्या बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 11,950 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.09.09.2024 रोजी 15.50 वा. सु. आनंदनगर पो ठाणे हद्दीत आनंदनगर बाजार दुकान समोर धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सुनिल महादेव नारकर, वय 42 वर्षे, रा. काकडे प्लॉट धाराशिव हे 15.50 वा. सु. आनंदनगर बाजार दुकान समोर धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,310 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.09.09.2024 रोजी 19.30 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत दर्गारोड धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-मस्तान बाबु पठाण, वय 41 वर्षे, रा. दर्गा रोड, वैराग नाका धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.30 वा. सु.दर्गा रोड धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,310 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-रहेमान आयुब सय्यद वय 20 वर्षे, रा. पिपळगाव कोटावळा ता. वाशी जि. धाराशिव हे दि.09.09.2024 रोजी 14.20 वा. सु. आपल्या ताब्यातील अशोक लिलॅण्ड दोस्त कंपनीचे पासिंग क्र एमएच 25 एजे 4259 हा जिजाउ चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नीप्रज्वलीत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल.”
  • कळंब पोलीस ठाणे:सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर गॅसशेगडी वर निष्काळजीपने अग्नीप्रज्वलीत करणाऱ्यांवर कळंब पोलीसांनी दि.09.09.2024 रोजी 17.55 वा. सु. कळंब ते येरमाळा रोड चौकाच्या सार्वजनिक रोडलगत होळकर चौक कळंब येथे कारवायी केली. यात आरोपी नामे-अजय रामचंद्र शेळके, वय 30 वर्षे, रा. बहुला ता. कळंब जि. धाराशिव हे आपल्या हातगाड्यावर गॅसशेगडीत निष्काळजीपने अग्नीप्रज्वलीत करुन भा.न्या.सं. कलम- 287 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो.ठा.येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “शस्त्र कायद्यांतर्गतगुन्हा नोंद.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :तामलवाडी पो.ठा. चे पथक दि. 09.09.2024 रोजी 14.20 वा. सु. तामलवाडी पो.ठा. हद्दीत गोंधळवाडी येथे रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-धनाजी अभिमान मोटे, वय 38 वर्षे, हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे विना परवाना स्वत:चे कब्जात एक तलवार बेकायदेशीररीत्या हातात घेउन फिरत असताना पथकास आढळला. सध्या धाराशिव जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे शस्त्र बंदी आदेश क्र जा. क्र 24/उप चिटणीस/ एम.जी.-3/ कावि-287 दि. 02.09.2024 अन्वये आदेश असताना देखील तलवार बाळगून मा. जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेशाचे उल्लंघन केले आहे. यावर पथकाने आरोपी यास ताब्यात घेउन त्याच्याजवळील ती तलवार जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25, मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-कलाम मिठ्ठुमियॉ कोतवाल, वय 43 वर्षे, रा.कसबे तडवळा ह.मु. राजीव गांधी नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 06.09.2024 रोजी 19.00 ते दि. 09.09.2024 रोजी 09.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने 1,80,000₹चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कलाम कोतवाल यांनी दि.09.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(4), 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-विलास विठ्ठल कांबळे, वय 60 वर्षे, रा.कोथळी ता उमरगा जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप आरोपी नामे- पोपट उमराव कांबळे, वय 35 वर्षे, किरण शिवाजी कांबळे, वय 30 वर्षे, मल्लीनाथ बसप्पा कांबळे, वय 50 वर्षे, आकाश शिवाजी कांबळे, वय 35 वर्षे, शांताबाई उमराव कांबळे, वय 60 वर्षे, सर्व रा. कोथळी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 25.02.2023 ते दि. 06.12.2023 रोजी 18.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम 32,000₹ असा एकुण 66,982₹ किंमतीचा माल चोरुन नेला होता. त्यामध्ये सदरचे प्रकरण मागे घ्यावे यासाठी नमुद आरोपींनी फिर्यादीस भाग पाडले होते. त्यानंतर सदर चोरीच्या रक्कमेपोटी चुकीचा व खाडाखोड केलेला धनादेश देवून फसवणुक केली. याबाबत फिर्यादीने विचारले असता नमुद आरोपींनी फिर्यादीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी कलम 156(3) प्रमाणे फिर्यादी नामे-विलास कांबळे यांनी दि.09.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. 380, 457, 454, 420, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-सुदर्शन अगंद मोटे, वय 32 वर्षे, रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे गोधंळवाडी शिवारातील शेतातील गोठ्यातुन एक म्हैस व एक गाय असे एकुण 70,000 ₹ किंमतीच्या ह्या दि.29.08.2024 रोजी 20.00 ते दि. 30.08.2024 रोजी 04.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुदर्शन मोटे यांनी दि.09.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे: दि.20.08.2024 रोजी 09.00 वा. सु. तेरणा तलाव तेर येथील जॅकविल विहरीवर एसटीएस मधील तांब्याच्या कॉईन, पॅनेल बोर्डमधील तांब्याचे केबल अंदाजे 75,000 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. तसेच स्वीच बॉक्स जाळून त्याचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल आनंतराव समुद्रे, वय 41 वर्षे, व्यवसाय उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.09.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2),324(2-6) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ लैंगीक अत्याचार.”
  • लोहारा पोलीस ठाणे :एका गावातील एक 3 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)दि. 09.09.2024 रोजी 17.00 वा.सु. ही खेळण्याससाठी घराशेजारील राहणारे एका तरुणाचे घराकडे गेली असता नमुद तरुणाने तिस घरात बोलावून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेची आईने दि. 09.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम- 64(1), 65(2), सह कलम 4, 6 बा.लै.अ.अधि 2012 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-सतिश सरडे, जयश्री सरडे, श्रध्दा सरडे, भाग्यश्री इंगळे, शंभु सरडे, किरण इंगळे, किरण इंगळेची आई सर्व रा. हडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, विशाल विजय छत्रे रा. विश्वास नगर तुळजापूर यांनी दि. 08.09.2024 रोजी 10.00 ते 16.00 वा. दरम्यान हडको तुळजापूर येथे फिर्यादी नामे- राजाभाउ उर्फ राजेंद्र दिगंबर माने, वय 53 वर्षे, रा. हडको तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना घराकडे जाण्या येण्याचा रस्त्याच्या करणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विटा, लोखंडी घनाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजाभाउ माने यांनी दि.09.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 126(2), 49, 118(1), 115(2), 324(4), 352, 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे: मयत नामे-मुरलीधर दगडु साठे, वय 50 वर्षे, रा.काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.15.08.2024 रोजी 14.30 ते 15.00 वा. सु. काक्रंबा ते तुळजापूर जाणारे रोडवर सोनार पट्टीजवळ पुलावरून मोटरसायकल क्र एमएच 25 ए 5590 वरुन जात होते. दरम्यान स्विफट डिझायर कार क्र एमएच 45 एन 9394 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मुरलीधर साठे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मुरलीधर साठे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच सदर कार चालक हा जखमीस उपचार कामी दवाखान्यात घेवून न जाता अपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी फिर्यादी नामे- अर्चना मुरलीधर साठे, वय 45 वर्षे रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.09.09.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ब), 106(1) सह मोवाका कलम 134 (अ) (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे: मयत नामे-सुरेश हरिदास शिंदे, रा. बालाजीनगर धाराशिव हे दि.07.09.2024 रोजी 18.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग क्श्र 52 तुळजापूर ते धाराशिव रोउवरील झंकार हॉटेल जवळील वारभुवन बिल्डींग समोर धाराशिव येथे समोरुन पायी जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 23 बीजी 1133 चा चालक नामे दिपक मच्छींद्र भिसे, वय 29 वर्षे, रा. सुलतानपुर ता. गेवराई जि. बीड यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून सुरेश शिंदे यांना समोरुन धडक दिली. या अपघातात सुरेश शिंदे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी फिर्यादी नामे- मनिषा सुरेश शिंदे, वय 47 वर्षे, रा. बालाजी नगर धाराशिव यांनी दि.09.09.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • कळंब पोलीस ठाणे:मयत नामे- संजना अभिजीत गव्हाणे, वय 20 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव हिने दि.05.09.2024 रोजी 09.00 वा.सु. गावातील आपल्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- अभिजीत बालाजी गव्हाणे,(पती), सुशिला बालाजी गव्हाणे, (सासु), बालाजी प्रभु गव्हाणे,(सासरे) सर्व रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांनी मागील काही दिवसांपासून मयत संजना हिस मटन का बनवून दिले नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण करुन तु आमच्या मुलाल फसवून त्याचे सोबत लग्न करुन घरात आलेली आहेस व तु आम्हाला पसंत नाही असे म्हणून मानसिक त्रास देत होते. त्यांचे त्रासास कटाळूंन संजना हिने राहते घरात गळफास घेवून आत्महात्या केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रामहरी लक्ष्मण नलगे, वय 50 वर्षे, रा. खामगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.09.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108, 115(2), 352, 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 20 छापे.”
  • मा. पोलीस अधीक्षक श्री.संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल सोमवारी दि.09.09.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 20 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 900 लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 357 लि. गावठी दारु, सुमारे 80 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 58 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 1, 60, 290 ₹ आहे. यावरुन 20 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 20 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)धाराशिव शहर पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-रेश्मा गोविंद काळे, वय 25 वर्षे, रा.पारधी पिडी, दुध डेअरी पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. पारधी पिडी दुध डेअरी पाठीमागे धाराशिव येथे अंदाजे 7,200 ₹ किंमतीची 80 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-सुनिता दिपक लोखंडे, वय 46 वर्षे, रा. इंदीरानगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 21.00 वा. सु. इंदीरानगरधाराशिव येथे अंदाजे 2,400 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-पांडुरंग प्रकाश कदम, वय 28 वर्षे, रा. अमित शिंदेच्या घराजवळ मारुती मंदीरासमोर लिंबोनी बाअ तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.00 वा. सु.काळे यांच्या राहते घराच्या पत्राचे शेडच्या बाजूला तांबरी विभाग धाराशिव येथे अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 2)भुम पो.ठाण्याच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-रतन सुभाष काळे, वय 34 वर्षे, रा.कल्याण नगर भुम ता. भुम ह.मु. वारेवडगाव ता. भुम जि. धाराशिव हे 14.30 वा. सु मारुती नाना गायकवाड यांचे घराचे पाठीमागे पत्राचे शेड समोर वारेवडगाव शिवार येथे अंदाजे 5,400 ₹ किंमतीची 90 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • आरोपी नामे-राम भिमराव कांबळे, वय 23 वर्षे, रा. वंजारवाडी, ता.भुम जि. धाराशिव हे 13.30 वा. सु वंजारवाडी फाटा येथील हॉटेल तुळजाभवानी समोर अंदाजे 1,890 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या
  • 3) परंडा पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सागर सुधीर करळे, वय 27 वर्षे, रा. नालगाव ता. परंडा जि. धाराशिव हे 12.40 वा. सु. संभाजी चौक येथील पानटपरी चे बाजूला रोडलगत मोकळ्या जागेत अंदाजे 800 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-दादा बबन करळे, वय 47 वर्षे, रा. नालगाव ता.परंडा जि. धाराशिव हे 14.45 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घराचे बाजूला अंदाजे 900 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 09 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-अशोक नवनाथ सोनवणे, वय 50 वर्षे, रा.सोनगिरी ता. परंडा जि. धाराशिव हे 13.50 वा. सु. सोनगिरी गावात जाणारे रोडलगत टपरीच्या आडोशाला सोनगिरी येथे अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 4)वाशी पो. ठाणाच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-फुलाबाई आबा शिंदे, वय 45 वर्षे, रा. खैराड वस्ती वाशी ता. वाशी जि. धाराशिव या 14.10 वा. सु गावातील आपल्या राहत्या घराचे पाठीमागे अंदाजे 1,350 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-कांताबाई वसंत शिंदे, वय 55 वर्षे, रा. चिरकाड पारधी पिडी पारा ता. वाशी जि. धाराशिव हे 17.10 वा. सु गावातील आपल्या राहत्या घराचे समोर अंदाजे 1,600 ₹ किंमती ची 19 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-सुनिल अंबरुशी काळे, वय 40 वर्षे, रा. पार्डी ता. वाशी जि. धाराशिव हे 16.00 वा. सु पार्डी ते ईसरुप जाणारे रोडचे बाजूला गोलेगाव ता. वाशी जि. धाराशिव येथे अंदाजे 2,400 ₹ किंमती ची 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 5)नळदुर्ग पो. ठाणाच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-शेषेराव भिमराव रणखांब, वय 43 वर्षे, रा. मुर्टा ता.तुळजापूर जि. धाराशिव हे 17.00 वा. सु एनएच 65 रोडवर इटकळ दुरक्षेत्र समोरील रोडवर अंदाजे 40,700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या 20 सिलबंद बाटल्या सह मोटरसायकल अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-विलास रामचंद्र चव्हाण, वय 45 वर्षे, रा.पिंजारवाडी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर हे 18.10 वा. सु नळदुर्ग तुळजापूर जाणारे रोडलगत असले सरकार धाब्याचे पाठीमागे आडेशाला अंदाजे 2,200₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 19 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-लक्ष्मण तानाजी शिंदे, वय 38 वर्षे, रा. सिंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.20 वा. सु सिंदगाव गावात पत्राचे शेडच्या पाठीमागे मोकळ्या जागेत अंदाजे 1,880 ₹ किंमतीची 18 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 6)बेंबळी पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-अरविंद बाळासाहेब सोमवंशी, वय 24 वर्षे, रा. आरणी ता. लोहारा जि. धाराशिव हे 13.30 वा. सु भंडारी शिवारात औसा ते तुळजापूर जाणारे रोडलगत हॉटेल सार्थक चे पत्री शेडचे पाठीमागे अंदाजे 6,000 ₹ किंमतीची 60 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 7)मुरुम पो.ठाणाच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-शेषेराव कोंडीबा क्षिरसागर, वय 60 वर्षे, रा. सुपतगाव ता. उमरगा जि. धाराशिव हे 11.00 वा. सु.गावातील आपल्या रहात्या घराचे मोकळ्या जागेत अंदाजे 2,000 ₹ किंमतीचे 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली
  • 8) येरमाळा पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे-जय विजय वाघमारे, वय 20 वर्षे, रा. वडगाव ज. ता. कळंब जि. धाराशिव हे 12.00 वा. सु वडगाव ज. येथेआपल्या राहत्या घराचे स्लॅपवर अंदाजे 45,000 ₹ किंमतीचे 500 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव सह मोबाईल फोन अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 9)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-उज्वला राजेंद्र पवार, वय 65 वर्षे, रा. रमाई नगर एमआडीसी रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे 15.30 वा. सु रमाई नगर एमआयडीसी रोड धाराशिव येथे अंदाजे 18,000 ₹ किंमतीचे 200 लि. गावइी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 10)धाराशिव ग्रामीण पो. ठाणाच्या पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- रोहीत संभाजी कांबळे, वय 29 वर्षे, रा.झोपडपट्टी आळणी ता. जि. धाराशिव हे 18.00 वा. सु आळणी झोपडपट्टी येथे अंदाजे 950 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 11) एसडीपीओ कार्यालय उमरगा पथकाने 1 ठिाकणी छापा टाकला. आरोपी नामे- पदमाकर सिताराम चव्हाण, वय 55 वर्षे, रा.राजेगाव ता. लोहारा जि. धाराशिव, हे 18.40 वा. सु होळी येथे आपल्या शेतात अंदाजे 16,000 ₹ किंमतीची 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
error: Content is protected !!