धाराशिव (जिमाका) – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी 12 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.या योजनेतील ज्या पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही,त्यांनी ते करुन घेवून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक बालाजी काळे यांनी केले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. जिल्हयात ४८ हजार ५०० लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द झाल्या आहेत.योजनेचा लाभ मिळणेकरीता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे.आधार प्रमाणीकरण केल्यानंतर लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. 46 हजार 522 शेतकरी लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले आहे. त्यापैकी ४४ हजार ६६४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १३० कोटी ५८ लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात आली आहे.अजुनही 1 हजार 978 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही.आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी महा-आयटी यांनी 12 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ योजनेचा लाभ घ्यावा. मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी बँकशी तात्काळ संपर्क करावा महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे.या योजनेच्या लाभार्थ्याच्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यापुर्वी निधन झाल्याने त्यांना प्रोत्साहनपर लाभ रक्कम अदा करता आलेली नाही,अशा मयत शेतकऱ्यांच्या वारसास लाभ देण्यासाठी महा-आयटीकडुन सुचना प्राप्त झाल्या आहेत.योजनेंतर्गत लाभार्थ्याच्या यादीतील मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी त्यांच्या बँक शाखेशी तात्काळ संपर्क करुन योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी केले आहे.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक